belgaum

बेळगावचे पोलीस अधिकारी संगमेश आनी यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर गगनभरारी

0
305
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयातील सीएआर विभागात कार्यरत असलेले आरएसआय संगमेश आणि यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे.

श्रीलंकेतील कोलंबो येथे पार पडलेल्या मानाच्या ‘आयर्न मॅन ७०.३’ या स्पर्धेत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले.

आरएसआय संगमेश यांनी प्रतिकूल परिस्थितीत ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपली क्षमता सिद्ध केली आहे.

त्यांच्या या कामगिरीमुळे बेळगाव शहर पोलीस दलासह राज्य पोलीस विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याचे पोलीस आयुक्तालयाने म्हटले.

स्पर्धेच्या दिवशी कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचे आव्हान स्वीकारत संगमेश यांनी सायकलिंग आणि २१ किलोमीटरची धावण्याची शर्यत अत्यंत कमी वेळेत पूर्ण केली. पोलीस दलातील कामाचा व्याप सांभाळून त्यांनी केलेल्या या कष्टामुळे ते तरुण पिढीसाठी आदर्श ठरले असल्याची भावना पोलीस विभागाने व्यक्त केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.