belgaum

पालकमंत्र्यांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक

0
289
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज गोकाकवरून हेलिकॉप्टरने थेट बेळगाव सुवर्ण विधानसौध गाठत जिल्ह्यातील विविध विकासकामे आणि प्रलंबित समस्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून कामांना गती देण्याबाबत निर्देश दिले.

पालकमंत्र्यांनी आज सुवर्ण सौध येथे बेळगाव जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी, साहाय्यक आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील रस्ते, आरोग्य आणि इतर नागरी समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली आणि सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, असे निर्देश दिले.

या बैठकीनंतर पालकमंत्र्यांसोबत बेळगावचे आमदार असिफ शेठ आणि कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी बळ्ळारीकडे प्रयाण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.