belgaum

कॅम्प येथील या रस्त्याचे विकास काम त्वरेने पूर्ण करण्याची मागणी

0
334
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कॅम्प, बेळगाव येथील महिला पोलीस स्थानक आणि सिंडिकेट बँकेसमोरील रस्त्याचे नूतनीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सध्या कॅम्प, बेळगाव येथील महिला पोलीस स्थानक आणि सिंडिकेट बँकेसमोरील खराब झालेल्या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. तथापि हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. सदर रस्ता हा कॅम्प येथील सततची रहदारी असणाऱ्या प्रमुख रस्त्यांपैकी एक आहे.

त्यामुळे रस्त्यावरील पूर्वीचे डांबरीकरण उखडून रस्त्याचे सपाटीकरण केल्यानंतर रस्त्याकडेला खडीचे ढीग आणून टाकण्यात आले होते. ते पाहता त्वरेने नवा रस्ता तयार केला जाईल असे अपेक्षित होते. मात्र तसे घडले नसल्यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून उखडलेल्या खडीमिश्रित मातीच्या खराब रस्त्यावरून पादचारी व वाहन चालकांना ये-जा करावी लागत आहे.

वाहने जपून संथगतीने हाकावी लागत असल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. विशेष करून दुचाकी वाहन चालकांना खडीमिश्रित मातीच्या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर रस्त्यावर एक दवाखाना, शाळा, बँक, छोटे व्यावसायिक आहेत. रस्त्याच्या संथ गतीने सुरू असलेल्या विकास कामामुळे परिसरातील सर्वांना मोठा त्रास, मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तसेच आसपासच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. तरी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याचे नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आदेश संबंधित कंत्राटदाराला द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.