belgaum

दोघा दुचाकी चोरट्यांकडून 5.35 लाखाच्या 13 मोटरसायकली जप्त

0
547
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कंग्राळी खुर्द येथील एका मोटरसायकल चोरी प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी काल दोघा दुचाकी चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडील 5 लाख 35 हजार रुपये किमतीच्या 13 मोटरसायकली जप्त केल्या.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे उमेश हणमंत बागेवाडी (वय 33 रा. घटप्रभा रोड, बेल्लद बागेवाडी ता. हुक्केरी जि. बेळगाव) आणि मौला हसनसाब हलकर्णी (वय 48, रा. गुडस ता. हुक्केरी जि. बेळगाव) अशी आहेत. या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की दुसरा क्रॉस, रामनगर, कंग्राळी खुर्द बेळगाव येथील दीपक गंगाधर भागानावर यांनी आपल्या हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरीची तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात नोंदवली होती.

या संदर्भात मार्केट उपविभागाचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यु. एस. आवटी यांच्या नेतृत्वाखाली तपास कार्य हाती घेऊन उपरोक्त दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी पोलीस चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

त्यानंतर चोरट्यांजवळील 4,55,000 रुपये किमतीच्या 11 हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकली आणि 80,000 रुपये किमतीच्या दोन हिरो एचएफ डीलक्स मोटरसायकली, अशी एकूण 5,35,000 रुपये किमतीची 13 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.