belgaum

संसाराचा गाडा ओढण्यासाठी महिलेची कोर्ट आवारात धडपड

0
578
 belgaum

बेळगाव लाईव्ह : वाढत्या महागाईच्या काळात संसाराला हातभार लावण्यासाठी पूजा नावाची एक कष्टकरी महिला बेळगावच्या कोर्ट आवारात फ्रूट सॅलड विक्रीचा व्यवसाय करत आहे. पहाटेपासून घराची जबाबदारी आणि मुलाची शाळा सांभाळून त्या जिद्दीने हा व्यवसाय चालवत आहेत.

सकाळी लवकर उठून घरकाम आटोपल्यानंतर आणि मुलाला शाळेत पाठवल्यानंतर पूजा यांचा खरा संघर्ष सुरू होतो. सकाळी १० वाजल्यापासून त्या कोर्टाच्या परिसरात फ्रूट सॅलडचा गाडा लावून दुपारी ३ वाजेपर्यंत त्या आपल्या कामात व्यस्त असतात.

पूजा यांच्याकडे केवळ २० ते ३० रुपयांमध्ये ग्राहकांना आरोग्यदायी फ्रूट सॅलड मिळते. यामध्ये हंगामी फळांसह पाच वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा समावेश असतो. फळांच्या या मिश्रणावर मध आणि चाट मसाल्याची चव असल्याने ग्राहक या सॅलडला पसंती देत आहेत.

 belgaum

महागाईच्या या काळात हताश न होता कष्ट करून स्वावलंबी होण्याचा मार्ग पूजा यांनी निवडला आहे. त्यांच्या या जिद्दीचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे कोर्ट आवारातील नागरिक आणि वकिलांकडून कौतुक होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.