belgaum

महिला विवस्त्र करून मारहाण प्रकरणातील12 आरोपींना कठोर शिक्षा

0
1003
court conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह : संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या बेळगाव तालुक्यातील वंटमुरी येथील महिलेच्या विवस्त्र मारहाण प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. बेळगावच्या अतिरिक्त १० व्या जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणातील १२ दोषींना प्रत्येकी पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावत पीडितेला न्याय दिला आहे.

बेळगाव तालुक्यातील वंटमुरी येथे एका महिलेचे कपडे उतरवून तिला अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. या घटनेने मानवतेला काळिमा फासला गेल्याची भावना संपूर्ण देशात व्यक्त झाली होती. या गंभीर प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, न्यायाधीश एच. एस. मंजुनाथ यांनी संबंधित कलमांखाली सर्व १२ आरोपींना दोषी ठरवून त्यांना शिक्षा आणि दंड ठोठावला.

या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोषींमध्ये बसप्पा नाईक, राजू नाईक, केंपन्ना नाईक, पार्वती नाईक, यल्लव्वा नाईक, लक्कप्पा नाईक, गंगव्वा नाईक, संगीता हेग्गनाईक, संतोष नाईक, शोभा नाईक, लक्कव्वा नाईक आणि शिवप्पा वन्नुरी यांचा समावेश आहे. न्यायालयाचा हा निर्णय वाचन सुरू असताना आरोपी आणि त्यांचे कुटुंबीय भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

 belgaum

या खटल्यात विशेष सरकारी वकील एल. एस. सुळ्ळद यांनी सरकारची बाजू मांडली. निकाल लागला तेव्हा आरोपींच्या बाजूचे वकील रविराज पाटील आणि शेख हे न्यायालयात उपस्थित नव्हते. या निकालाने अशा अमानुष कृत्य करणाऱ्यांविरोधात कडक संदेश गेला असून, पीडितेच्या कायदेशीर लढाईला यश मिळाले आहे.

शिक्षा जाहीर होताच न्यायालयात उपस्थित आरोपी व त्यांच्या कुटुंबीय भावूक झाले होते.या वेळी सरकारी विशेष सरकारी वकील एल. एस. सुळ्ळद तसेच आरोपींच्या बाजूने वकील रविराज पाटील आणि शेख हे न्यायालयात अनुपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.