belgaum

मच्छे हिंदू सभा प्रकरणात हर्षिता ठाकूरसह इतराना जामीन

0
1502
 belgaum

बेळगाव लाईव्ह :मच्छे, बेळगाव येथे आयोजित हिंदू सभेदरम्यान पिरनवाडी प्रार्थना स्थळावर बाण सोडल्याच्या समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप असलेल्या हर्षिता ठाकूर (रा. महाराष्ट्र) यांच्यासह इतर 6 जणांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

मच्छे येथे आयोजित हिंदू सभेप्रसंगी पिरनवाडी प्रार्थना स्थळावर बाण सोडत असल्याचे दर्शविणारा हर्षिता ठाकूर यांचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. या वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणात हर्षिता ठाकूर (रा. महाराष्ट्र) यांच्यासह इतर 6 जणांवर दोन धर्मियांत तेढ निर्माण केल्याचा आरोप ठेवून गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर या सर्वांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाची दखल घेत गेल्या 31 जानेवारी 2026 रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपींचा जामीन मंजूर केला आहे.

मच्छे येथे गेल्या दि. 18 जानेवारी 2026 रोजी हिंदू सभेच्या कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त वक्तव्ये करणे आणि दोन धर्मीय तेढ निर्माण केल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे. यावेळी सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्याचा आरोप हर्षिता ठाकूर यांच्यावर करण्यात आला होता.

 belgaum

यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपासानुसार या प्रकरणात एकूण सहा जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेतील कलम 189(2), 191(2), 142, 302, 352 तसेच कलम 190 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

न्यायालयात आरोपींच्यावतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी 5,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व हमीपत्रावर जामीन मंजूर केला. तसेच पोलीस तपासात सहकार्य करणे, कोर्टात नियमित हजेरी लावणे व साक्षीदारांवर दबाव न आणणे अशा अटी घातल्या आहेत. आरोपींच्यावतीने ॲड प्रताप यादव काम पाहत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.