बेळगाव लाईव्ह :संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शून्य प्रहरात आपला मुद्दा उपस्थित करताना विधान परिषद सदस्य इरान्ना कडाडी यांनी केंद्र सरकारच्या उडान योजनेची मुदत संपल्यानंतर बेळगाव विमानतळावरील हवाई संपर्कात मोठी घट झाल्याचे अधोरेखित केले.
संसदेत कडाडी यांनी निदर्शनास आणून दिले की, बेळगाव विमानतळाचे पूर्वी प्रमुख शहरांना जाणारे अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत.
ज्यामुळे सामान्य जनतेला तसेच संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

जिल्ह्यातील रहिवाशांसाठी आणि धोरणात्मक गरजांसाठी सुधारित कनेक्टिव्हिटी अर्थात हवाई संपर्क आवश्यक आहे, यावर भर देऊन इरान्ना कडाडी यांनी केंद्र सरकारला बेळगावला मुंबई, पुणे, चेन्नई, इंदूर आणि जयपूरसह प्रमुख शहरांशी जोडणारी हवाई सेवा त्वरित सुरू करण्याची विनंती केली.




