belgaum

त्या.. कारचालकावरील हल्ला प्रकरणी मुख्य आरोपींना जामीन मंजूर

0
453
Conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या कारचालकावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपींना बेळगावच्या प्रथम जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश सुभाष संकद यांनी हा आदेश दिला असून, या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रियेला आता नवीन वळण मिळाले आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवा ऊर्फ शिवराया संगप्पा पुजारी आणि मितेश शंकर वाडीगेर (दोघेही रा. गोजगा, ता. जि. बेळगाव) यांना न्यायालयाने जामीन दिला आहे. ६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी क्लब रोडवर ही घटना घडली होती.

फिर्यादी बसवंत कडोलकर आणि त्यांचे सहकारी ज्यूस पिण्यासाठी गेले असताना, आरोपींनी त्यांच्याशी वाद घालून चाकूने छातीवर, पोटावर आणि हातापायावर वार केले होते. या हल्ल्यानंतर कॅम्प पोलिसांनी दोन्ही आरोपींना तातडीने अटक केली होती.

 belgaum
Conviction

न्यायालयाने जामीन मंजूर करताना आरोपींना काही कडक अटी घातल्या आहेत. प्रत्येकी एक लाखाचे हमीपत्र आणि तेवढ्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, साक्षीदारांना धमकावू नये, पुन्हा अशा प्रकारचा कोणताही गुन्हा करू नये आणि प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहावे, अशा अटींवर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

या प्रकरणी आरोपींच्या वतीने ॲड. प्रताप यादव, ॲड. हेमराज बेंचण्णवर, ॲड. स्वप्नील नाईक आणि ॲड. प्रज्वल अथणीमठ यांनी न्यायालयात बाजू मांडली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.