belgaum

फिल्मी स्टाईलने लॉरी चालकावर प्राणघातक हल्ला

0
822
lorry
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील क्लब रोड परिसरात थरारक आणि चित्रपटातील दृश्यासारखी घटना घडली असून, धावत्या लारीवर चढून चालकावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात लारी चालक अयाझ सावनूर (वय 36, रा. रुक्मिणी नगर, बेळगाव) गंभीर जखमी झाला आहे.

आठ जणांनी मिळून अयाझवर हल्ला केल्याचा आरोप असून, या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंडलगा परिसरात अयाझच्या लारीने एका कारला धडक दिली होती. त्यानंतर लारी न थांबवता पुढे गेल्याने संबंधित कारमधील लोकांनी लारीचा पाठलाग करून क्लब रोड परिसरात लारी ओव्हरटेक केली आणि चालकावर थेट हल्ला केल्याचा आरोप आहे.

आरोपींनी अयाझच्या जांघ, कान, पाठ आणि डोक्यावर चाकूने सपासप वार केले. तसेच लारीवर दगडफेक करून काचाही फोडण्यात आल्या. या संपूर्ण घटनेत मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला.गंभीर जखमी अवस्थेत अयाझला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तो आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. मुलाची अवस्था पाहून कुटुंबीयांचा आक्रोश सुरू आहे.

 belgaum

घटनेची माहिती मिळताच बेळगाव कॅम्प पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. ही घटना बेळगाव कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

lorry

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.