बेळगाव लाईव्ह :कडोली येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणाने ताण-तणावातून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून आठवड्याभरातील गावात ही दुसरी घटना असल्याचे चर्चा सुरू झाली आहे.
संतोष रमेश हंपन्नावर (वय २९ लक्ष्मी गल्ली, कडोली) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याच्या पक्षात पत्नी, दोन मुली, एक भाऊ, असा परिवार आहे. दरम्यान याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, संतोष हा केदनुर येथे केशकत्रनालयाचे काम करत होता. तो नेहमीप्रमाणे आपल्या कामावर जात होता. सोमवारी त्याने घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपण आपल्या मित्रांसोबत बाहेर जाणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर तो बाहेर पडला. दरम्यान सोमवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे दुकानात गेला. काही उशीर कामही केले. दरम्यान सोमवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास त्याने दुकानातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकी आले आहे. दरम्यान याबाबत सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे कडोली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर काकती पोलीस स्थानकात याची माहिती देण्यात आली. काकती पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला.
उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्याव ताब्यात देण्यात आला. अंत्यविधी कडोली ग्रामपंचायत मधील गुंजन हट्टी येथील वाघमारे येथे असलेल्या लिंगायत स्मशानभूमीत सायंकाळी झाले आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.





