.
बेळगाव लाईव्ह : आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या, मात्र स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या घटकांपैकी एक म्हणजे बांधकाम कामगार. सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे, असे सांगत प्रत्येकाने काम करताना नियमांचे पालन करावे, अशी सूचना म.ए. समितीचे नेते व अभियंते आर.एम. चौगुले यांनी कामगारांना दिली. रविवार (ता. 11) रोजी येळ्ळूर येथे समाज सारथी सेवा संघाच्या वतीने आयोजित बांधकाम कामगारांच्या महामेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
श्री चांगळेश्वरी मंदिरामध्ये या कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा लक्ष्मी मासेकर होत्या. बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष अॅड. एन.आर. लातूर यांनी कामगारांना सरकारी योजना व त्यांचा लाभ कसा घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी कामगार कार्डचे महत्त्व स्पष्ट करत सर्वांनी त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.
अल्ट्राटेकच्या गणपती मुंबारे आणि सोनिया अनगोळकर यांनी अल्ट्राटेक सिमेंटकडून बांधकाम कामगार, कंत्राटदार आणि अभियंत्यांसाठी उपलब्ध असलेल्या योजना सविस्तर सांगितल्या. रोटरीचे जिल्हा प्रांतपाल अशोक नाईक यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले. सरकारी कंत्राटदार विजयराव धामणेकर यांनीही संघटनेच्या कामाचे अभिनंदन केले.
या मेळाव्यात समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर, निवृत्त पीडीओ दुर्गाप्पा ताशिलदार आणि येळ्ळूरचे सुपुत्र चंदन कुमार खेमणाकर यांची नौदलात लेफ्टनंट म्हणून बढती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सरकारी कंत्राटदार विजयराव धामणेकर आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीने कामगारांना भेटवस्तू वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीच्या पूजनाने झाली, त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्रा. सी.एम. गोरल यांनी करून दिली. सूत्रसंचालन निवृत्त शिक्षक अनिल हुंदरे आणि डी.जी. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन दत्ता उघाडे यांनी केला.

समाज सारथी सेवा संघाचे सदस्य गोविंद कालसेकर, शिवाजी सायनेकर, प्रकाश अष्टेकर, मनोहर गोरल, बी.एन. मजुकर, डॉ. तानाजी पावले, यल्लुपा पाटील, हणमंत कुगजी, सुरज गोरल, दुद्दापा बागेवाडी, राजू पावले, बळीराम देसुरकर, रमेश धामणेकर, बबन कानशिडे, परशराम बिजगरकर, संजय गोरल, शंकर टक्केकर, प्रकाश पाटील, कृष्णा बिजगरकर, परशराम कणबरकर, परशराम धामणेकर, सतीश देसुरकर, रघुनाथ मुरकुटे, गंगाधर पाटील, संजय मजुकर, सतीश पाटील, सुभाष मजुकर, परशुराम निंगाप्पा धामणेकर, मोहन पाटील आणि इतर सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.





