बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील तुडीये गावात बेळगाव तुडिये बससेवा KSRTC सुरू करावी अन्यथा
कर्नाटक पासिंगच्या कोणत्याही वाहनांना शिनोळी सीमेत प्रवेशास मज्जाव करण्यात येईल असा इशारा शिवसेना नेते प्रभाकर खांडेकर देण्यात आला आहे.
बेळगाव तुडिये कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची (KSRTC) अधिकृत बससेवा तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी तुडीये ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
तुडीये–बेळगाव (कर्नाटक) बससेवा सुरू करण्याची दीर्घकाळची मागणी प्रशासनाकडून दुर्लक्षित राहत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून चंदगड तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना तीन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, शिवसेना नेते प्रभाकर (दादा) खांडेकर यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांनी प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा सीमाभागात तीव्र जनआंदोलन उभे राहील, असा इशाराही दिला.
आंदोलन स्थळी शिवसेना तालुका प्रमुख कल्लापा नेवगिरे, युवा नेते पिणू पाटील, माजी सभापती शांताराम बापू पाटील, सरपंच सुतार, उपसरपंच अशोक पाटील, अण्णा गटाचे नेते गुरव, माजी उपसरपंच मारुती पाटील, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे सतीश पाटील, गणपती पाटील, बशीरकट्टी, सुनील नार्वेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





