बेळगाव लाईव्ह : बैलहोंगल तालुक्यात नातवंडांना खेळवण्याच्या किरकोळ वादातून मुलाने आपल्या वृद्ध वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली आहे. या हल्ल्यात बसय्या एणगीमठ (६२) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगावच्या बिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विजय एणगीमठ असे हल्ला करणाऱ्या मुलाचे नाव आहे. बसय्या यांची दोन्ही मुले शेजारीच राहतात, मात्र त्यांच्यात मुलांच्या खेळण्यावरून नेहमी वाद होत होते. विजय याने आपल्या मुलांना थोरल्या भावाच्या घरी नेण्यास वडिलांना विरोध केला होता, ज्यावरून मंगळवारी घरात वादावादी झाली.
यावेळी वडिलांनी मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला असता, संतापलेल्या विजयने चाकूने वडिलांवर सपासप वार केले. या हल्ल्यात बसय्या हे रक्तबंबाळ होऊन कोसळले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
बैलहोंगल पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपी मुलाचा शोध घेत आहेत.





