बेळगाव लाईव्ह :मच्छे, बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजू नाईक यांनी रस्त्यावर सापडलेला किमती मोबाईल फोन त्याच्या मालकाला परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले.
टिळकवाडी येथील जीएसएस महाविद्यालयात काम करणाऱ्या गणेश के. धामणेकर यांचा मोबाईल फोन गेल्या 26 डिसेंबर रोजी हरवला होता.
तो फोन मच्छे येथील सामाजिक कार्यकर्ते राजू नाईक यांना सापडताच त्यांनी फोन मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर आपल्याला सापडलेला फोन धामणेकर यांचा असल्याचे समजताच राजू यांनी त्यांच्याशी संपर्क साधला.

तसेच बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे बोलावून घेऊन त्यांना त्यांचा मोबाईल फोन सुखरूप परत केला. याबद्दल धामणेकर यांनी राजू नाईक यांच्या प्रामाणिकपणाची प्रशंसा करून त्यांचे मनापासून आभार मानले.





