belgaum

बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनकडून मनपाकडे १७ महत्त्वपूर्ण मागण्या

0
587
 belgaum

बेळगाव लाईव्ह : (Belgaum) क्लॉथ मर्चंट्स असोसिएशन (BCMA) व ट्रेडर्स कौन्सिलने बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त कार्तिक एम. (KAS) यांना प्री-बजेट निवेदन सादर करून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित व प्राधान्यक्रमित मागण्यांचा तपशील दिला आहे.

या निवेदनात असोसिएशनने स्पष्ट केले आहे की बेळगावच्या एकूण जीडीपीपैकी सुमारे ६५ टक्के योगदान वस्त्रोद्योग व कापड व्यापारातून येते, तर जवळपास ३५ टक्के नागरिकांना या क्षेत्रातून रोजगार मिळतो. त्यामुळे बाजारपेठा, वाहतूक, स्वच्छता, सुरक्षा व पायाभूत सुविधा या बाबींना येणाऱ्या अर्थसंकल्पात विशेष प्राधान्य देणे आवश्यक आहे.


BCMA च्या प्रमुख मागण्या

१) व्यापार परवाने (Trade Licence) सोपे व सुलभ करा

ऑनलाइन प्रणाली असली तरी व्यापाऱ्यांसाठी अधिक जनजागृती, मार्गदर्शन काउंटर व प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी.

२) ‘व्हायब्रंट बेळगाव’ वार्षिक ट्रेड व सिटी फेअर

कापड, हस्तमाग, MSME व स्थानिक उत्पादने सादर करणारा वार्षिक मेळा भरवावा, ज्यामुळे पर्यटन, रोजगार व गोवाशी खरेदी पर्यटनाला चालना मिळेल.

३) एकमेव सिटी हेल्पलाईन

नागरिकांच्या सर्व तक्रारींसाठी एक केंद्रीत हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध करून त्वरित निवारण व्यवस्था.

४) महिलांसाठी विशेष सार्वजनिक शौचालये

मुख्य बाजारपेठांमध्ये ‘पिंक टॉयलेट्स’, क्षेत्रनिहाय सर्वेक्षण व PPP/NGO मॉडेलद्वारे देखभाल.

५) प्री-पेड ऑटो रिक्षा बूथ

CBT बस स्थानक, चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी सर्कल, रेल्वे स्टेशन, गोवावेस–नाथ पै सर्कल (शहापूर/वडगाव) येथे.

६) बाजारपेठेत शटल/मिनी बस सेवा

NWKRTC सहकार्याने बाजार व व्यापारी भागांसाठी अल्प अंतराची बस सेवा. पी

७) पिण्याच्या पाण्याची व्हेंडिंग मशीन

गर्दीच्या बाजारात सुरक्षित पाणी उपलब्ध करावे.

८) पार्किंग व मल्टिलेव्हल पार्किंग

किमान चार मल्टिलेव्हल पार्किंग कॉम्प्लेक्स, बाजाराजवळ पार्किंग झोन निश्चित करणे आणि पार्किंग आधी – दंड नंतर.

९) SAS मालमत्ता कर वाढ पुढे ढकला

कोविडनंतरची आर्थिक स्थिती पाहता वाढ पुढील आर्थिक वर्षापर्यंत स्थगित ठेवावी.

१०) महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकर्स झोन

महिलांसाठी सुरक्षित चालण्याचे मार्ग व ज्येष्ठांसाठी ‘नाना–नानी पार्क’.

११) CCTV व बाजारात प्रकाशव्यवस्था

सर्व प्रमुख व्यापारी भागांत CCTV आणि अधिक प्रकाश.

१२) ग्रीन सिटी व शहरी पर्यावरण

वारसा वृक्षांचे संरक्षण, नव्या रस्त्यांमध्ये मातीची जागा, शहरी वन, भरपाई वृक्षारोपण व नागरिकांचा सहभाग.

१३) प्रभागनिहाय तक्रार निवारण कक्ष

वॉर्ड स्तरावर सार्वजनिक तक्रार कक्ष स्थापन करावेत.

१४) बाजार स्वच्छता व कचरा व्यवस्थापन (इंदूर मॉडेल)

स्मार्ट सिटी कंट्रोल सेंटरद्वारे थेट निरीक्षण, वैज्ञानिक कचरा वर्गीकरण, पूरप्रवण व बाजार भागांवर विशेष लक्ष.

१५) पाणीपुरवठा व स्मशानभूमी सुविधा

सर्व प्रभागांत समान व नियमित पाणीपुरवठा, सुस्थितीत स्मशानभूमी.

१६) दीर्घकालीन वस्त्रोद्योग विकास

बेळगावसाठी टेक्सटाईल क्लस्टर प्रस्ताव, राज्य व केंद्र सरकारकडे सादर करणे आणि शहराला प्रादेशिक वस्त्रोद्योग केंद्र म्हणून विकसित करणे.

१७) रस्त्यांची नावे व दिशादर्शक फलक

संपूर्ण शहरात स्पष्ट, मानक व दृश्यमान नेमबोर्ड व दिशादर्शक फलक लावावेत.


BCMA ने म्हटले आहे की या सर्व उपाययोजना येणाऱ्या अर्थसंकल्पात समाविष्ट झाल्यास बेळगाव शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित, हिरवेगार आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेल, तसेच व्यापार व रोजगाराला मोठी चालना मिळेल.

या निवेदनावर BCMA अध्यक्ष सतीश आर. तेंडुलकर, सचिव मुकेश खोडा, खजिनदार नितेश जैन तसेच ट्रेडर्स कौन्सिलचे पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री कार्यालय, महापौर व उपमहापौरांनाही पाठविण्यात आली आहे.यावेळी विकास कलघटगी उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.