बेळगांव ः अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई व दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १० व रविवार दि.११ असे दोन दिवस अ. भा. साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अधिवेशन बेळगावात होत आहे. हे अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या स्थानिक स्वागत समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी द. म. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. राजाभाऊ पाटील होते.
दि. १० रोजी रात्री ८ वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.
दि. ११ रोजी चार सत्रात होत असलेल्या या अधिवेशनात शोभायात्रा , उद्घाटन सोहळा, परिसंवाद व खुले अधिवेशन होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. महाराष्ट्र व इतर राज्यांतून येणाऱ्या प्रतिनिधींचे यथोचित स्वागत करण्याचे ठरविण्यात आले.
श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल इंग्लिश स्कूलशेजारी) रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ, खानापूर रोड, बेळगांव येथे हे अधिवेशन होणार आहे.

बैठकीस प्रकाश मरगाळे, प्रा. विक्रम पाटील, दीपक देसाई, शंकरराव चौगुले, कृष्णा शहापूरकर, शेखर पाटील, अर्जुन चौगुले, शिवलिला मिसाळे, एस. आर. पाटील आदी उपस्थित होते.





