बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२६ चे माध्यमिक व महाविद्यालयीन गटाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ही स्पर्धा ६ जानेवारी २०२६ रोजी मराठा मंदिर व तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, बेळगाव येथे उत्साहात पार पडली होती.
या स्पर्धेत बेळगावसह परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. दोन्ही गटांतून गुणवंत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
माध्यमिक गटाचे विजेते
प्रथम क्रमांक वेदांत रवींद्र वीर (९ वी, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर (९ वी, महाराष्ट्र हायस्कूल, येळ्ळूर) तर तृतीय क्रमांक वैदेही विनायक पाटील (९ वी, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) यांनी मिळवला.
चतुर्थ क्रमांक श्रिया नारायण पाटील, साईराज राम गुरव आणि समृद्धी विनायक येळवे यांनी विभागून मिळवला. पाचवा क्रमांक हर्ष गावडू पाटील, सहावा क्रमांक प्रेरणा विजय पाटील व जिज्ञेश रवींद्र गुरव, सातवा क्रमांक जयदिप खेमणाकर, परम भावकू पाटील, भूषण गोविंद मुतकेकर व अजिंक्य अमित देसाई यांनी विभागून मिळवला.
आठवा क्रमांक मनाली सुभाष बराटे व गणेश राजू बेन्नाळकर, नववा क्रमांक प्रणव प्रशांत वंदुरे-पाटील आणि दहावा क्रमांक रुचा रवी गोडसे यांनी मिळवला.
उत्तेजनार्थ श्रावणी राजेंद्र नायकोजी, वेदांत नवनाथ ठोंबरे, संस्कार प्रवीण कुगजी, स्मितल विठ्ठल बडसकर, ऋषिकेश महागावकर व मिथिला मंगेश पाटील यांची निवड झाली.

महाविद्यालयीन गटाचे विजेते
प्रथम क्रमांक रुपेश वैजनाथ पाटील (एम.बी.ए., एम.आय.टी., पुणे) यांनी मिळवला. द्वितीय क्रमांक साक्षी परशराम गोरल (बेळगाव) तर तृतीय क्रमांक आकाश मारुती पाटील व किरण शामराव भोंडवे (के. डी. एस. पी. कॉलेज, नाशिक) यांनी विभागून पटकावला.
चतुर्थ क्रमांक जगन्नाथ मारुती कुंडेकर, पाचवा क्रमांक रोहित हरिबा खन्नूकर, सहावा क्रमांक मिलिंद पाटील, सातवा क्रमांक प्रथमेश सुभाष चांदीलकर, ज्योतिबा बबन चौगुले व यश तारीहाळकर यांनी विभागून मिळवला.
आठवा क्रमांक साक्षी पांडुरंग गुरव व सुरज पाटील, नववा क्रमांक सौम्या तानाजी पाखरे आणि दहावा क्रमांक श्रेया सुभाष चांदीलकर यांनी मिळवला. उत्तेजनार्थ सानिका सदाशिव कांबळे (B.Sc., बेळगाव) यांची निवड झाली.
बक्षीस वितरण
सर्व विजयी स्पर्धकांचे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून अभिनंदन करण्यात आले आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून १ मार्च २०२६ रोजी मराठा मंदिर कार्यालय, बेळगाव येथे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार असून सर्व स्पर्धकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




