belgaum

उड्डाणपुलासाठी ‘ना हरकत’ सादर करा -डीसींची सर्व विभागांना सूचना

0
328
dc roshan
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात प्रस्तावित असलेल्या उड्डाणपूल प्रकल्पासाठी विविध विभागांकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्रे (एनओसी) सादर करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये झालेल्या या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, वाहतूक पोलीस, हेस्कॉम विभाग, पाणी पुरवठा विभाग, दूरसंचार विभाग वगैरे संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी (डीसी) मोहम्मद रोशन यांनी प्रस्तावित उड्डाण पुलासाठी ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्याची सूचना सर्व विभागांना केली. नियोजित उड्डाणपुलामुळे शहरातील वाहतुकीचे समस्या दूर होण्यास मदत होणार असून वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले.

 belgaum

उड्डाणपुलामुळे सिग्नल वरील थांबे कमी होतील, अवजड वाहनांची वाहतूक वेगळी करता येईल आणि आपत्कालीन सेवांना जलद मार्ग उपलब्ध होईल, असे मत अधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केले.

जिल्हाधिकारी रोशन यांनी सर्व संबंधित विभागांना तातडीने आवश्यक कागदपत्रे आणि ना हरकत सादर करण्याच्या सूचना करण्याबरोबरच उड्डाणपुलाचे काम वेळेत सुरू होण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.