बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गुंजी गावातील एक महिला आपल्या दोन लहान मुलांसह गेल्या २० दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १० डिसेंबर रोजी बेळगाव शहरातून या तिघांचा संपर्क तुटला असून अद्याप त्यांचा कोणताही शोध लागलेला नाही.
जेनिफर सायमन मास्करेन (वय ३२) असे बेपत्ता महिलेचे नाव असून, तिच्यासोबत तिची मुलगी किओना सायमन मास्करेन (वय ८ वर्षे) आणि मुलगा एड्रिएल सायमन मास्करेन (वय ४ वर्षे) हे देखील बेपत्ता आहेत.
१० डिसेंबर रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास ही महिला माडीगुंजी येथील आपल्या घरातून बेळगावमधील केएलई क्लिनिकमध्ये तपासणीसाठी आली होती. मात्र, तिथून ती घरी परतलीच नाही.
गेल्या २० दिवसांपासून नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही या तिघांचा काहीही पत्ता लागलेला नाही. बेपत्ता झालेली महिला आणि मुलांबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास किंवा ते कोठे दिसून आल्यास सायमन गुंजी: +91 95904 15530 अनीस: +91 72046 ४६४२८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





