belgaum

येळ्ळूरमधून ‘मराठी सन्मान यात्रेला’ भक्कम पाठिंबा

0
390
 belgaum

बेळगाव लाईव्ह | महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने युवा नेते शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली रायगड येथे निघणाऱ्या ‘मराठी सन्मान यात्रेत’ येळ्ळूर गावातील शेकडो कार्यकर्ते व वारकरी भजनी मंडळ सहभागी होणार आहेत. या यात्रेला पाठिंबा जाहीर करण्यासाठी लक्ष्मी गल्लीतील दत्त मंदिर येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीपूर्वी महाराष्ट्र चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते श्री. वामनराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवहिंद चेअरमन शिवाजी सायनेकर, अभियंता हणमंत कुगजी व प्रशांत मजुकर यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले.

युवा नेते शुभम शेळके यांनी मार्गदर्शन करताना,
“येळ्ळूर गाव नेहमीच सीमालढ्याचा अग्रभागी राहिले आहे. आजही शेकडो कार्यकर्त्यांनी ‘मराठी सन्मान यात्रेत’ सहभाग दर्शवून आपली निष्ठा दाखवून दिली आहे. येळ्ळूरने दाखवलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू,” असे ठामपणे सांगितले.

 belgaum

बैठकीत दुद्दापा बागेवाडी यांनी युवकांनी सीमालढ्यात सक्रिय सहभाग घेऊन चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. तर प्रकाश अष्टेकर यांनी येळ्ळूरने ज्येष्ठांप्रमाणेच युवा चळवळीच्या पाठीशीही ठाम उभे राहिल्याचे नमूद केले.
खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती ही ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सीमाप्रश्न सुटेपर्यंत लढा तेवत ठेवेल, असे आश्वासन देत देणगीदारांचे आभार मानले. अमोल जाधव, गणेश अष्टेकर, श्रीकांत नांदूरकर आदींनीही मनोगत व्यक्त केले.

  • १६ वर्षांनंतर पुन्हा श्वान–मांजर प्रदर्शन

    १६ वर्षांनंतर पुन्हा श्वान–मांजर प्रदर्शन

    बेळगाव लाईव्ह :जिल्हा पंचायत बेळगाव, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभाग तसेच कर्नाटक व्हेटरनरी असोसिएशन (जिल्हा शाखा, बेळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने “बेळगाव श्वान व मांजर प्रदर्शन – २०२६” चे आयोजन आज प्रजासत्ताक दिनी सरदार मैदानावर करण्यात आले. गेल्या तब्बल १६ वर्षांपासून बंद असलेले हे प्रदर्शन जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून पुन्हा…


  • व्याख्यान मालेत मिळाली विद्यार्थ्यांना स्वप्नांची नवी दिशा

    व्याख्यान  मालेत मिळाली विद्यार्थ्यांना स्वप्नांची नवी दिशा

    बेळगाव लाईव्ह:“परिस्थिती माणसाला थांबवत नाही, तर भीती थांबवते…”हा विचार शब्दांत नव्हे, तर अनुभवातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा क्षण हिंडलगा येथे अनुभवायला मिळाला. कै. श्री एम. डी. चौगुले व्याख्यानमालेच्या समारोप सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत स्वप्नं आणि मनात आत्मविश्वास दिसत होता. ग्रामीण व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली ही व्याख्यानमाला म्हणजे केवळ कार्यक्रम नव्हता — तो स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणारा…


  • घर रिकामं ठेवलं तरी पोलिसांचा पहारा!

    घर रिकामं ठेवलं तरी पोलिसांचा पहारा!

    बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात वाढत असलेल्या घरफोडी व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी बेळगाव पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्या संकल्पनेतून ‘Locked House Beat System’ ही अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, जे नागरिक काही दिवसांसाठी शहराबाहेर जाणार असतील, त्यांनी आपल्या घराचा पत्ता, लोकेशन पिन आणि गैरहजेरीचा कालावधी बेळगाव शहर पोलिस कंट्रोल रूमच्या WhatsApp…


या मराठी सन्मान यात्रेला येळ्ळूर मराठी साहित्य संमेलन, हिंदवी स्वराज्य युवा संघटना, वारकरी संप्रदाय भजनी मंडळ, छत्रपती विराट गड संवर्धन पथक, छत्रपती विराट हलगी पथक, शेतकरी कामगार गणेशोत्सव (कलमेश्वर गल्ली), शिवसेना (विराट गल्ली), गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दुर्गा माता मंडळ आणि उषानारायण फाउंडेशन यांनी अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.

यात्रेसाठी आर्थिक व साहित्य स्वरूपात मोठा हातभार लावण्यात आला. नितेश फकिरा काकतकर यांनी २५ हजार रुपये, श्रीकांत शिवाजी नांदूरकर यांनी १० हजार रुपये (२ क्विंटल तांदूळ), सुनील वामनराव पाटील १० हजार, हणमंत लु. कुगजी ५,०५१, अमित य. पाटील ५,०००, परशराम निंगापा धामणेकर ५,०००, बाळासाहेब पावले ५,०००, हिंदवी स्वराज्य संघटना ५,०००, प्रभाकर मंगणाईक २,५०० तर कलमेश्वर गल्ली कामगार संघटनेनेही देणगी दिली.
श्रीचांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे प्रसाद यल्लोजी मजुकर यांनी २० बॉक्स पाण्याच्या बाटल्यांची देणगी दिली. तसेच मिलिंद अष्टेकर, महेश कुगजी, ऋषी मजुकर व प्रवीण मजुकर यांनी वैद्यकीय किट्स उपलब्ध करून दिले.

या कार्यक्रमाला उदय जाधव, राजू पावले, प्रकाश पाटील, सुरज गोरल, अनिल हुंदरे, गोविंद बापूसाहेब पाटील, रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य पिंटू चौगुले, यल्लापा पाटील, सतीश देसुरकर, मनोज कुगजी, विनोद लोहार, संकल्प जाधव, सागर नायकोजी, ओमकार पाटील, सुमंत कुगजी, योगेश कदम, राहुल कुगजी, प्रवीण मुचंडी, भावू हलगेकर, किरण उडकेकर, गजानन कुंडेकर, अवधूत लोहार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते दत्ता उघाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.