belgaum

म्हणे.. शुभम शेळके यांना हद्दपार करा…!

0
1113
 belgaum


बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्याविरोधात कर्नाटक रक्षण वेदिकेचा (टी.ए. नारायण गौडा गट) पुन्हा थयथयाट सुरु झाला असून शुभम शेळके यांच्यावर गुंडा ॲक्ट लावून त्यांना बेळगावमधून हद्दपार करावे, अशी हास्यास्पद आणि बिनबुडाची मागणी आज पोलीस आयुक्तांकडे ‘करवे’ने केली आहे.

करवेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगेनट्टी यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदनात शुभम शेळके हे केवळ सीमावासियांच्या हक्कासाठी आणि मराठी अस्मितेसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत आहेत.

SHubham shelke yuva samiti

मात्र, त्यांच्या या रोकठोक भूमिकेला ‘विष पेरणे’ असे नाव देऊन त्यांना अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न कन्नड संघटनांकडून केला जात आहे.

 belgaum

कोणतेही सबळ पुरावे किंवा कायदेशीर आधार नसताना केवळ राजकीय द्वेषापोटी एका युवा नेत्याच्या हद्दपारीची मागणी करणे, ही ‘करवे’ची निव्वळ स्टंटबाजी असल्याची चर्चा आता सीमाभागात रंगली आहे. शिवाय कन्नड संघटनांच्या या माकडचाळ्यांची खिल्लीही उडवली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.