बेळगाव लाईव्ह :रामनगर, पहिला क्रॉस कंग्राळी खुर्द (ता. जि. बेळगाव) येथे 15 दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाचा उपचाराचा फायदा न होता आज शुक्रवारी सकाळी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
निधन पावलेल्या युवकाचे नांव प्रमोद नागेश मनवाडकर (वय 30, रा. रामनगर, पहिला क्रॉस कंग्राळी खुर्द) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्जाच्या बोजामुळे नैराशेच्या भरात आपले जीवन संपवण्यासाठी प्रमोद याने गेल्या रविवारी 14 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास विष प्राशन केले.
सदर प्रकार उशिराने घरच्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रमोद याला सायंकाळी 6 वाजता तातडीने बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. हॉस्पिटलमध्ये प्रमोद याचा जीव वाचवण्यासाठी गेले 15 दिवस डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते.

तथापि त्यांच्या प्रयत्नांना यश न येता दुर्दैवाने आज शुक्रवारी सकाळी प्रमोद मनमाडकर याचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई-वडील, विवाहित मोठी बहीण आणि लहान भाऊ असा परिवार आहे. सदर घटनेची एपीएमसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.




