belgaum

मटका जुगार खेळणारे 5 जण पोलिसांकडून गजाआड

0
599
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये पोलिसांनी काल बुधवारी मटका जुगार खेळणाऱ्या एकूण 5 जणांना अटक केली असून त्यांच्या जवळील रोख 4,060 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे विनायक दीपक सांबरेकर (वय 39, रा. तहसीलदार गल्ली बेळगाव), आसिफ नूरअहमद शेख (वय 34, रा. 4था क्रॉस लक्ष्मीनगर काकती, सध्या रा. खताल गल्ली बेळगाव), सुनील शामराव जाधव (वय 63, रा. टीचर्स कॉलनी खासबाग बेळगाव), आरिफ शापुरी (रा. काकती बेळगाव) आणि मल्लिकार्जुन यल्लाप्पा कांबळे (वय 40, रा. मलप्रभानगर बेळगाव) अशी आहेत. यापैकी विनायक सांबरेकर हा शिवाजी रोड नाल्याजवळील सार्वजनिक रस्त्याशेजारी लोकांचे पैसे मुंबई मटका जुगारावर लावत होता त्यावेळी खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद अदगोंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या जवळील रोख 1,020 रुपये व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या. याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दुसऱ्या प्रकरणात शहरातील जुन्या भाजी मार्केट कार पार्किंग जवळ सार्वजनिक ठिकाणी मुंबई मटका हा जुगार खेळणाऱ्या आसिफ, सुनील व आरिफ या तिघांना मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रंगेहात पकडून अटक केली.

तसेच त्यांच्या जवळील रोख 1,790 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. यासंदर्भात मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तिसऱ्या प्रकरणात मल्लिकार्जुन कांबळे हा शहरातील वडगाव येथील मलप्रभानगर येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांचे पैसे मुंबई मटका जुगारावर लावत होता. त्याला रंगेहात पकडून शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीकंट पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच्या जवळील रोख 1250 रुपये व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

हालगा येथे बेकायदा दारू विक्री करणारा पोलिसांच्या ताब्यात

हालगा (ता. जि. बेळगाव) गावाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी कायदेशीररित्या दारूची विक्री करून ती पिण्यास देणाऱ्या एका इसमाला हिरेबागेवाडी पोलिसांनी बुधवारी अटक केली.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव भूपाळ अभय देसाई (वय 48, रा. पाटील गल्ली, हालगा बेळगाव) असे आहे. भोपाळ हा हालगा गावाच्या हद्दीतील हॉटेल सुवर्ण पॅलेसच्या मागील बाजूस असलेल्या खुल्या जागेत सार्वजनिक ठिकाणी दारूची बेकायदेशीर विक्री करण्याबरोबरच दारू पिण्यासही देत होता. याबाबतची माहिती मिळताच काल हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकून भूपाळ देसाई याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या जवळील रोख 200 रुपये आणि ओरिजिनल चॉईस व्हिस्कीची 180 मि.ली. मापाची रिकामी पाकिटे जप्त केली. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.