बेळगाव लाईव्ह :बस्तवाड गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून हिरेबागेवाडी पोलिसांनी काल शुक्रवारी 5 जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्या जवळील रोख 3,600 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.
बुद्धीराज शांतिनाथ भागन्नावर (वय 33, रा. संभाजी गल्ली, बस्तवाड बेळगाव), किरण नारायण बिल्लारे उर्फ गवळी (वय 45, रा. अळवण गल्ली, शहापूर बेळगाव) भरतेश माणिक संकेश्वरी (वय 52, रा. होसगेरी गल्ली, बस्तवाड बेळगाव) विनायक प्रकाश गवळी (वय 37 रा. अळवण गल्ली, शहापूर बेळगाव) आणि सुरज प्रकाश दळवी (वय 28, रा. मेन रोड बसवन कुडची बेळगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हे सर्वजण काल शुक्रवारी बस्तवाड गावाच्या हद्दीतील धामणे रोड शेजारील स्मशानाकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी सार्वजनिक ठिकाणी पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत होते.
याबाबतची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. पै यांनी आपल्या सहकाऱ्यांसमोर धाड टाकून उपरोक्त आरोपींना ताब्यात घेतले तसेच त्यांच्या जवळील रोख 3,600 रुपये आणि 52 पत्त्यांचा कॅट जप्त केला याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.




