बेळगाव लाईव्ह:बेळगाव येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर (MLIRC) येथे डिफेन्स सेक्युरिटी कॉर्प्स (DSC) साठी भरती रॅली आयोजित करण्यात आली आहे. ही भरती 16 व 17 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे.
ही भरती फक्त मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटचे माजी सैनिक (Ex-Servicemen) यांच्यासाठी असून Soldier General Duty (GD) आणि Soldier Clerk (SD) या पदांसाठी नोंदणी होणार आहे.
भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता मराठा LIRC, बेळगाव येथे हजर राहणे आवश्यक आहे.
भरतीसाठी वयोमर्यादा Soldier GD साठी 46 वर्षांखाली तर Soldier Clerk (SD) साठी 48 वर्षांखाली असावी. तसेच Soldier GD साठी पुनर्नियुक्ती (Re-enrolment) ही सेवानिवृत्तीनंतर दोन वर्षांच्या आत असणे बंधनकारक आहे.
या भरती रॅलीमुळे मराठा लाईट इन्फन्ट्रीतील माजी सैनिकांना पुन्हा देशसेवेत सहभागी होण्याची मोठी संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे संपर्क साधावा.





