belgaum

प्राणघात हल्ल्याप्रकरणी आम. सवदी यांच्यावर कारवाईची मागणी

0
456
 belgaum

बेळगाव लाईव्ह : द बेळगाव डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक एम्पलोयी युनियनचे अध्यक्ष एन. के. करेन्नवर आणि अन्य पदाधिकारी व सदस्यांवर हल्ला करणाऱ्या डीसीसी बँकेचे संचालक माजी आमदार लक्ष्मण सवदी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी द बेळगाव डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक एम्पलोयी युनियन बेळगावने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आज सोमवारी सकाळी मोठ्या संख्येने जमलेल्या द बेळगाव डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक एम्पलोयी युनियनच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून चौकशीअंती लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.

आमच्या युनियनचे अध्यक्ष एन. के. करेन्नवर, सरचिटणीस डी. जे. कमतगी, सदस्य अभय लकडी आणि महाबळ पाटील हे गेल्या बुधवारी 3 जानेवारी 2026 रोजी कामानिमित्त अथणी गावामध्ये अथणी मतदारसंघाचे आमदार आणि डीसीसी बँकेचे संचालक लक्ष्मण एस. सवदी यांची भेट घेण्यास गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर आमदारांसह त्यांच्या कुटुंबीयांनी अर्वाच्च शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला केला.

 belgaum

या हल्ल्यात अध्यक्ष एन. के. करेन्नवर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम अथणी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी बेळगाव येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेसंदर्भात दुसऱ्या दिवशी केलेल्या तक्रारीवरून अथणी पोलीस ठाण्यामध्ये लक्ष्मण सवदी यांचे पुत्र चिदानंद सवदी व इतर कांही लोकांवर एफआयआर दाखल झाला आहे. दुसरीकडे आमदार लक्ष्मण सवदी यांच्या दबावावरून आमच्या अध्यक्षांच्या विरोधात अथणी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांनी सवदी यांच्या निवासस्थानी दंगा घातल्याची खोटी तक्रार दाखल करून घेतली आहे.

तरी या प्रकरणाची सखोल पारदर्शक चौकशी करून अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. सदर निवेदनाची प्रत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना देखील धाडण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.