बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील जुन्या भाजी मार्केट जवळ सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून मार्केट पोलिसांनी काल तिघा जणांना अटक केली असून त्यांच्या जवळील रोख 7,510 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. धाड पडताच अन्य एक आरोपी फरारी झाला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे कुणाल अजय अष्टेकर (वय 22) संजय सुभाष पाटील (वय 40. रा दोघेही तहसीलदार गल्ली बेळगाव) आणि सादिक हशम हाजे (वय 48, रा. कामत गल्ली बेळगाव) अशी आहेत. त्याचप्रमाणे फरारी आरोपीचे नांव गजानन शशिकांत गरडे (रा. कामत गल्ली, बेळगाव) असे आहे.
हे चौघेजण काल शहरातील जुन्या भाजी मार्केट जवळ सार्वजनिक ठिकाणी मुंबई मटका या जुगारावर लोकांचे पैसे लावत होते. त्यावेळी मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून तिघांनाही ताब्यात घेतले.
तसेच त्यांच्या जवळील रोख 7,510 रुपये आणि मटक्याचा चिठ्ठ्या जप्त केल्या. धाड पडताच चौथा आरोपी गजानन गरडे हा पोलिसांच्या हातातून निसटून पळून जाण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस फरारी आरोपीचा शोध घेत आहेत.





