बेळगाव लाईव्ह :रहदारी नियमांची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याऐवजी बेळगावच्या रहदारी पोलिसांनी स्वतःच नियम पायदळी तुडवून वाहतूक कोंडी केल्याची निषेधार्थ घटना आज शनिवारी सकाळी पाटील गल्ली येथे श्री शनी मंदिरानजीक घडली.
शहरातील पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिराजवळ रविवार पेठचा रस्ता आणि कपिलेश्वर ओव्हर ब्रिजचा रस्ता येऊन मिळतो. त्यामुळे या ठिकाणी सतत मोठी राहणारी असते.
मात्र याची जाणीव असून देखील आज शनिवारी सकाळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी असलेल्या स्वतः रहदारी पोलिसांनीच रस्त्यामध्ये आपले ‘होयसळा’ हे पोलीस वाहन (क्र. केए 22 जी 1016) उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता.
परिणामी वाहतूक कोंडी झाल्यामुळे कांही दुचाकी वाहन चालकांनी पोलिसांना त्यांचे ते वाहन रस्त्यावरून बाजूला घेण्याची विनंती केली. तथापि वाहतूक कोंडी झालेली पाहून देखील पोलिसांनी आपले वाहन रस्त्यावरून हलवले नाही.
रहदारी पोलिसांच्या या अरेरावीबद्दल सर्वसामान्य वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कायद्याचे रक्षक असणारे पोलीसच या पद्धतीने गैरवर्तन करत असतील त्यांना शिक्षा, दंड कोण करणार? असा संतप्त सवालही केला जात आहे.




