बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य सरकारच्या शेतकरी धोरणाच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे छेडण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मालिनी सिटी मैदानासह सुवर्ण विधानसौध परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
कर्नाटक राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आज मंगळवारी माननीय सिटी येथे भव्य मेळावा घेऊन सुवर्ण विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा भारतीय जनता पक्षाचे राज्य अध्यक्ष विजयेंद्र यांनी काल केली आहे.
या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून सुवर्ण विधानसौध परिसरात विशेष करून मालिनी सिटी मैदानासह हालगा परिसर आणि अलारवाडी ब्रिज या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुमारे 2000 हून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली असून सदर ठिकाणी जिकडे पहावे तिकडे पोलीसच दिसत आहेत.

एकंदर परिस्थिती पाहता मराठी भाषिकांच्या कालच्या महामेळाव्याप्रसंगी ज्या पद्धतीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना दिवसभर अटक करण्यात आली, त्याच पद्धतीने भाजपचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी त्यांच्या नेतेमंडळींना देखील अटक करण्यात येणार असल्याचे समजते.


