बेळगाव लाईव्ह :जीएस फाउंडेशन संस्थेतर्फे शालेय तसेच खुल्या गटासाठी येत्या रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी कडोली (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायत मर्यादित भव्य मिनी मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
जीएस फाउंडेशन संस्थेतर्फे मागील 5 वर्षांपासून ही शर्यत आयोजित केली जात असून यंदा जाफरवाडी गावांमध्ये या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेला जाफरवाडी गावातील श्री बसवाना मंदिरापासून प्रारंभ होणार आहे.
विविध गटात घेण्यात येणार्या या शर्यतीतील गाव मर्यादित असणाऱ्या पाचवी ते सातवी इयत्तेच्या मुला-मुलींच्या गटासाठी धावण्याचे अंतर 2 कि.मी., तसेच आठवी ते बारावी इयत्तेच्या मुला -मुलींच्या गटासाठीचे अंतर 5 कि.मी. इतके अंतर असणारा असून पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5000, 4000, 3000, 2000 आणि 1000 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
खुल्या गटासाठी शर्यतीचे अंतर 10 कि.मी. इतके असणार आहे. या शर्यतीतील विजेत्यांना अनुक्रमे 7000, 5000, 3000, 2000 आणि 1000 रुपयांचे बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे याव्यतिरिक्त शर्यतीत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धांना मोफत टी-शर्ट दिले जाणार आहेत
तरी स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या धावपटूंपैकी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील शारीरिक शिक्षकांकडे आणि खुल्या गटातील धावपटूंनी शिक्षक एन. आर. पाटील यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत. तसेच इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 9845306292 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

