बेळगाव लाईव्ह :मानवी-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आणि अरण्यातील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, खानापूर तालुक्यातील जंगल परिसरात वसलेल्या आमगाव येथील रहिवाशांना देखील स्थलांतरित करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी हमी अरण्य, जीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर बी. खंड्रे यांनी दिली आहे.
गुरुवारी त्यांची भेट घेऊन स्थलांतराची विनंती केलेल्या अमरगावच्या रहिवाशांशी बोलताना ते म्हणाले की, आपण मंत्री झाल्यानंतर प्रथमच स्वयंस्फूर्तीने जंगलातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केलेल्या, वाघ संरक्षित क्षेत्राबाहेरील भीमगड अभयारण्यातील तळेवाडी येथील 27 कुटुंबांचे यशस्वीपणे स्थलांतर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अमरगाव तसेच इतर वस्तींच्या स्थलांतरासाठीही लवकरच पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.
तळेवाडी स्थलांतराबाबत काही जण अपप्रचार करत आहेत. जंगलातील वसती स्थलांतरित केल्यास अरण्यवासी समाजाच्या मुख्य प्रवाहात येतात, मानवी-वन्यजीव संघर्ष कमी होतो आणि मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने जंगल संवर्धनालाही मदत होते, असे ते म्हणाले.

काही लोकांना सर्व सुविधा हव्या असतात; पण अरण्यात राहणाऱ्या अरण्यवासीयांनी मात्र कोणत्याही मूलभूत सुविधांशिवाय जंगलात राहावे, अशी त्यांची अपेक्षा असते.
सरकारच्या सद्हेतूच्या योजना राबवताना अनावश्यक आक्षेप घेतले जातात, तक्रारी केल्या जातात आणि अरण्यवासीयांना चुकीची माहिती दिली जाते. अशा कोणत्याही अफवांकडे कानाडोळा करू नका, असे आवाहन त्यांनी केले.


