Friday, December 5, 2025

/

अतिक्रमणावरून कंग्राळीतील  ग्रामस्थ आक्रमक

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कंग्राळी खुर्द –  येथील रामदेव गल्लीतील रस्त्यावरील अतिक्रमणांवरून नागरीक आज पुन्हा आक्रमक झाले . तक्रारीची दखल न घेतल्याने आज मुख्य रस्ता बंद करून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पण पोलासांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मध्यस्थी करून ते टाळले तर ग्राप च्या वतीने आज शनिवार पर्यंत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिलेने नागरीक शांत झाले .


या बाबत सविस्तर वृत्त असे की या गावातील रामदेव गल्लीच्या टोकाशी एका जागा मालकांने रस्ता व गटारीसाठी जागा न सोडल्याने गेल्या दोन तीन वर्षापासून तक्रार होती .  त्या ठिकाणी रस्ता एकदम अरुंद झालेले चारचाकी वाहने जाणे येणे अशक्य झाले आहे . ग्रापकडे या संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून अर्ज येथील रहिवाशांनी दिले आहेत . ग्रापच्या वतिनेही संबंधीत मालकांला वेळोवेळी नोटीसा बजावल्या आहेत पण त्याचा त्याचेवर काही परिणाम झाला नाही .

सर्वांच्या सहमतीने दोन वेळा मोजणी यंत्राणे तर दोन वेळा टेपने संबंधीत मालकाच्या जागेची मोजणी करण्यात आली . त्याची 7 / 12 ला  9 गुंठे जमीन असून प्रत्यक्ष साडे नऊ गुंठे भरत आहे . तरीही तोडगा काढून  समोरचा जमीन मालकांचा जास्त जागा जात असूनही त्यांची  समजूत काढून .  किमान 16 फुट रस्ता करण्याचे ग्राप मध्ये सर्वांच्या संमंतीने निश्चीत केले . त्यानुसार मोजमाप केल्यानंतर संबधीत मालकाचे दोन ते तीन फुट कंपाऊंड काढण्याचे  ठरले त्या नुसार त्याला नोटीसा गेल्या आहेत पण काहीच परिणाम नाही . अतिक्रमण निघालेच नाही .आता या गल्लीत नवीन सीसी रस्ता होत असलेने अतिक्रमण काढून रस्ता काम केले जाईल असे सांगितले . पण काम सुरू होताच त्या मालकांने पुन्हा उलटा पवित्रा घेतला असून काही कारण नसताना त्याच्या हद्दी पासून पुढे रस्ता कामच अडवले त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला

 belgaum

. त्यांनी 1 डिसेंबर रोजी रस्ताकाम बंद करून आंदोलन केले होते दोन दिवसात निर्वाळा होईल असे ग्राप कडून सांगण्यात आले परंतू चार दिवस ओलांडले तरी निर्णय न झाल्याने आज पुन्हा येथील रहिवाशी आक्रमक झाले व नाईलाजाने रास्तारोकोचा प्रयत्न केला वेळीच एपीएमसी पोलीस ठाण्यातील अधिकारी व सहकारयांनी  उपस्थित राहून कायदा हातात घेणे चुकीचे असल्याचे सांगून प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून ही तुमची समस्या ग्राप मार्फत  सुटणारी आहे असा सल्ला दिला . ग्राप च्या वतीने ग्राप अध्यक्षा , पीडीओ  व अन्य सदस्यांनी पुन्हा एकदा प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून उद्यापर्यंत ( शनिवार ) तुमची समस्या सोडवून रस्ता कामही केले जाईल असे आश्वासन दिले आहे .

* मागच्या महिण्यात या पुढील  शिवाजी गल्लीत एका व्यक्तीला सौम्य  हृदयविकाराचा झटका आला होता . त्याला नेण्यासाठी ॲम्बूलन्स आली होती पण अतिक्रमणामुळे वळली नाही वेळेत दवाखाण्यात नेता आले नाही त्यामुळे त्या व्यक्तीला प्राण गमवावे लागले होते याचीही दक्षता अजून कोन का घेत नाही अशी चर्चा त्या ठिकाणी होती .
* * संबंधीत व्यक्तीची तीन मुले भारतीय सेनेत आहेत प्रत्येक वेळी ती व्यक्ती व त्यांच्या घरातील महिला मिलीट्री चा धाक देतात असेही पीडित नागरीक आरोप करत असतात .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.