belgaum

‘बीम्स’चा सावळा गोंधळ : डॉक्टरांअभावी लांबले शवविच्छेदन

0
371
Bims
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटल मधील शवविच्छेदन विभागाचा सावळा गोंधळ सुरूच असून डॉक्टर नसल्यामुळे मृताच्या नातेवाईकांना शवविच्छेदन विभागासमोर ताटकळत थांबावे लागल्याचा संतापजनक प्रकार गेल्या शुक्रवारी घडला. अलीकडे शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तब्बल 15 ते 16 तास लागत असल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

गेल्या शुक्रवारी घडलेल्या प्रकाराची थोडक्यात माहिती अशी की, त्या दिवशी रात्री विष प्राशन केलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदन विभागात आला. त्यावेळी उपस्थित डॉक्टरांनी त्या मृतदेहाचे विच्छेदन आपण सकाळी करू असे आश्वासन दिले. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी 11 वाजले तरी डॉक्टरांचा पत्ता नसल्यामुळे मृताच्या नातेवाईकांनी त्याची माहिती वैद्यकीय अधीक्षकांना दिली. तथापि त्यांनी हात झटकल्यामुळे वरिष्ठांकडे तक्रार करताच तातडीने डॉक्टर शवविच्छेदन विभागात हजर झाले. सदर प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून यामुळे सिव्हिल मधील शवविच्छेदन विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अलीकडे शवविच्छेदनासाठी मृताच्या नातेवाईकांना दीड ते दोन दिवस ताटकळत थांबावे लागत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकारावरून येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

 belgaum

विष प्राशन, अपघात, सर्पदंश, आत्महत्या, आकस्मिक मृत्यू झाला तर मृतदेहाचे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केले जाते. हॉस्पिटलच्या सर्व विच्छेदन विभागात दररोज सरासरी 7 ते 8, कांही वेळेला 10 ते 15 मृतदेहांचे विच्छेदन करावे लागते. परिणामी समस्या निर्माण होत असून या विभागात जादा कर्मचारी आणि डॉक्टरांच्या नियुक्तीची गरज आहे.

तरी हॉस्पिटल प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने डॉक्टरांची नियुक्ती करावी. तसेच बिम्सच्या वैद्यकीय अधीक्षकांकडून जबाबदारी झटकण्याचा जो प्रकार घडला, त्याकडे प्रादेशिक आयुक्तांनीच गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.