belgaum

वज्रपोहा धबधबा परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी : ईश्वर खंड्रे यांचे आदेश

0
408
ishwar khandre
 belgaum

बेळगाव लाईव्ह : जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचे संकट पाहता वृक्ष संवर्धन आणि संरक्षण हे वन विभागाचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असे प्रतिपादन वन व पर्यावरण मंत्री ईश्वर खंड्रे यांनी केले. बेळगाव येथील सुवर्णविधानसौध येथे आयोजित वन अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

पश्चिम घाटाव्यतिरिक्त इतर भागात हरित आच्छादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे आणि महामार्गांच्या दुतर्फा लावलेल्या झाडांचे ऑडिट करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

वन जमिनीवरील अतिक्रमणाबाबत भूमिका स्पष्ट करताना मंत्र्यांनी सांगितले की, उदरनिर्वाहासाठी ३ एकरपेक्षा कमी जमीन कसणाऱ्या गरिबांना त्रास देऊ नका, मात्र ३ एकरपेक्षा जास्त आणि २०१५ नंतर झालेली सर्व नवीन अतिक्रमणे तातडीने हटवा.

 belgaum
Ishwar khandre

हटवलेल्या जमिनीवर स्थानिक प्रजातींची झाडे लावून तिथे पुन्हा वने विकसित करा, असे त्यांनी म्हटले. तसेच वज्रपोह धबधबा परिसरात युवकांच्या वाढत्या गर्दीमुळे वन्यजीवांना त्रास होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत, तिथे प्रवेशबंदी करण्याचे आणि पर्यटनामुळे कोणत्याही दुर्घटना घडू नयेत म्हणून कडक पावले उचलण्याचे आदेश त्यांनी दिले.

वन्यजीव आणि मानवी संघर्ष रोखण्यासाठी अरण्य हद्दीतील गावांमध्ये जनसंपर्क सभा आयोजित कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली. शेतातील तारांच्या कुंपणामध्ये बेकायदेशीरपणे वीजप्रवाह सोडून वन्यजीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कडक लक्ष ठेवावे आणि वन्यजीव कायद्याबाबत लोकांमध्ये जागृती करावी, असे त्यांनी यावेळी म्हटले. गोकाक येथील घटप्रभा पक्षी अभयारण्यात पर्यटकांसाठी अधिक बोटींची व्यवस्था करून पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.