बेळगाव लाईव्ह :भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले आंबेवाडी (ता. बेळगाव) येथील जवान मयूर लक्ष्मण धोपे (वय 27) यांचे सेवा बजावत असताना झालेल्या अपघातानंतर उपचारादरम्यान निधन झाले.
जवान मयूर धोपे हे 7003 EME बटालियन मध्ये कार्यरत होते. सेवा बजावत असताना झालेल्या जळीत (Burn) अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना 10 नोव्हेंबर 2025 रोजी कोलकाता येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच 14 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 4.55 वाजता त्यांचे निधन झाले.
अपघाताच्या वेळी जवान कर्तव्यावर (On Duty) होते.
या प्रकरणी मेडिको लीगल केस (MLC) दाखल करण्यात आला असून चौकशी प्रक्रिया (Court of Inquiry) सुरू आहे.

जवान मयूर धोपे हे अविवाहित असून त्यांच्या पश्चात वडील लक्ष्मण धोपे कुटुंबीय आहेत. त्यांचे पार्थिव मंगळवारी रात्री मराठा सेंटर आणण्यात आले असून त्यानंतर बुधवारी सकाळी मूळ गावी आंबेवाडी बेळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मयूर याला सैन्यदलात भरती होऊन सात वर्षे झाली होती त्याच्या पश्चात दोन बहिणी वडील काकू काका असा परिवार आहे त्याने आता पर्यंत भोपाळ ,जम्मू काश्मीर, अमृतसर आणि नागालँड या ठिकाणी सेवा बजावली होती.
सैन्यदलात सेवा बजावणाऱ्या जवानाच्या आकस्मित निधन झालेल्या घटनेमुळे आंबेवाडी गावावर परिसरात शोककळा पसरली आहे.




