बेळगाव लाईव्ह : एअरमन ट्रेनिंग स्कूल (ATS), बेळगाव येथे अग्निवीरवायु प्रशिक्षणार्थींच्या सहाव्या बॅचचा (AGVT 02/2025) पासिंग आऊट परेड 06 डिसेंबर 2025 रोजी उत्साहात पार पडला. तब्बल 1,264 पुरुष व महिला अग्निवीरवायूंनी 22 आठवड्यांचे कठोर आणि परिवर्तनशील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.
या भव्य परेडचे पुनरावलोकन अधिकारी म्हणून भारतीय हवाई दलाचे सहाय्यक हवाई अधिकारी (प्रशिक्षण) एअर वाइस मार्शल वेनकट टी. मारे उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणार्थींच्या शिस्त, नेमकेपणा आणि परेडमधील उत्कृष्ट प्रदर्शनाचे कौतुक केले.
कार्यक्रमात विविध श्रेणींतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.
- AGVT आशिष गुर्जर आणि AGVT neeraj – बेस्ट इन अकॅडेमिक्स
- AGVT रीहांशू नाथावत – बेस्ट इन जनरल सर्व्हिस ट्रेनिंग
- AGVT कुमावत विवेक गोवर्धन – बेस्ट मार्क्समन
- AGVT प्रियांशू सिंह – बेस्ट ऑल-राउंडर
एअर वाइस मार्शल मारे यांनी सर्व अग्निवीरवायूंना जागरूक, सक्षम आणि नेहमी कर्तव्यनिष्ठ राहण्याचे आवाहन केले. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत नवनवीन कौशल्ये आत्मसात करत मिशन-रेडी राहण्याचा संदेश त्यांनी दिला.
या सोहळ्याला अग्निवीरवायूंच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. आपल्या मुलांच्या यशस्वी वाटचालीचे साक्षीदार होताना कुटुंबीयांची भावना उचंबळून आली. Reviewing Officer यांनी पालकांच्या निःस्वार्थ पाठिंब्याचे कौतुक करत, भावी हवाई योद्धे घडविण्यात त्यांच्या भूमिकेचे विशेष महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचा समारोप एअर ऑफिसर कमांडिंग आणि ATS च्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक करून करण्यात आला. युवकांना सक्षम, शिस्तबद्ध आणि सज्ज अग्निवीरवायू बनवण्यात त्यांच्या अथक प्रयत्नांचे Reviewing Officer यांनी अभिनंदन केले.


