belgaum

दिवसाही जळताहेत सुवर्ण विधानसौध विज्ञान उद्यानातील दिवे

0
48
sc park
 belgaum

बेळगाव लाईव्ह : विजेसारख्या ऊर्जेची बचत करणे ही काळाची गरज असताना खुद्द ऊर्जा विभाग अर्थात हेस्कॉमचेच त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. शहरातील काही रस्त्यांवरील पथदीप दिवसादेखील जळत असतात हे सर्वश्रुत आहे. तथापि आता सरकारचे सत्ता प्रदर्शनाचे केंद्र असलेल्या बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे देखील हेस्कॉमने आपल्या अंदाधुंदी कारभाराचे प्रदर्शन घडवण्यास सुरुवात केली आहे.

सुवर्ण विधानसौध येथील सायन्स पार्क गार्डन या विज्ञान उद्यानातील दिवे आज शनिवारी सकाळी 8 वाजून गेले तरी चालूच असल्याचे पहावयास मिळत आहे. एकीकडे विजेची बचत व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असताना या पद्धतीने दिवसाढवळ्या उद्यानातील दिवे सुरू ठेवून विजेचा अपव्यय केला जात असल्यामुळे जागरूक नागरिकात तीव्र नाराजी प्रकट होत आहे. तसेच या ना त्या कारणास्तव अलीकडे कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक शहराच्या एखाद्या भागातील वीजपुरवठा खंडित करून जनतेला वेठीस धरणाऱ्या हेस्कॉमने आत्मपरीक्षण करून स्वतःची कार्यपद्धती सुधारण्याची गरज असल्याचे मत देखील व्यक्त होत आहे.

सुवर्ण सौध सायन्स पार्क गार्डनमध्ये वीज वापरातील निष्काळजीपणा स्पष्ट दिसून आला आहे.आज सकाळी ८ वाजूनही **इलेक्ट्रिक पोलवरील लाईट्स बंद न केल्याचे निदर्शनास आले. या मार्गावर नियमित ये-जा करणाऱ्या नागरिकांनी वीज वाया जाण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

 belgaum
sc park

🔹 नागरिकांचा सवाल “सुवर्ण सौधचे वीज बिल थकीत असल्याच्या बातम्या येतात, आणि इथे दिवसाढवळ्या लाईट चालू ठेवून वीज वाया घालवली जाते याची जबाबदारी कोणाची?”

वीज वापरातील विसंगती ➡️ एकीकडे सरकारी संस्थांचे थकीत हेस्कॉम बिल प्रकरण समोर येते,
➡️ आणि दुसरीकडे सुवर्ण सौध पार्कमध्ये दिवसाही लाईट्स सुरू, अशी परिस्थिती.
नागरिकांच्या मते, वीज बचतीचे संदेश देणारेच विभाग वीज वाया घालवताना दिसतात, ही मोठी विसंगती आहे.बेळगावातील सुवर्ण सौधमध्ये दिवस ८ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी अशा निष्काळजीपणामुळे देखभाल आणि व्यवस्थापनावरील प्रश्नचिन्हे उभी राहत आहेत.

🔸 “जागोजागी वीज बचत मोहीम, आणि इथे सरकारी खर्चावर दिवसा लाईट!”
🔸 “जनतेकडून कर, आणि पैशांची अशी उधळपट्टी?”
🔸 “हेस्कॉम अधिकारी तपास करणार का?”


प्रशासनाकडे अपेक्षा
✔️ स्वयंचलित लाईट कंट्रोल सिस्टम
✔️ नियमित विजेची तपासणी
✔️ जबाबदार विभाग निश्चिती
✔️ गैरजबाबदार वीज वापरावर कारवाई

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.