Friday, December 5, 2025

/

त्यांची .. पन्नास वर्षांनी झाली अविस्मरणीय भेट

 belgaum

बेळगाव लाईव्ह :पन्नास वर्षांचा काळ उलटून गेला… आयुष्यात अनेक बदल झाले… पण शाळेच्या आठवणी ताज्याच!
बेळगावातील सेंट मेरीज हायस्कूलच्या 1974 व 1975 च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी तब्बल अर्ध्या शतकानंतर एकत्र येत भावनिक पुनर्मिलन साजरे केले. पै रिसॉर्ट येथे झालेल्या या सोहळ्यात जुन्या मैत्रीच्या, शरारतीच्या आणि शाळेच्या दिवसांच्या आठवणींनी वातावरण क्षणभरातच ओथंबून गेले.

या भेटीस निवृत्त मुख्याध्यापक श्री. प्रेमरत्नम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर राजेंद्र पिल्ले अध्यक्षस्थानी होते.
बोलताना प्रेमरत्नम यांनी सांगितले की,“1974 आणि 1975 च्या बॅचना शाळेचे सुवर्ण पर्व म्हणता येईल. क्रीडा आणि शिक्षणात या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून सेंट मेरीजला नावारूपास आणले. शाळेच्या विकासाचा मजबूत पाया याच बॅचने घातला.”

देशाच्या विविध भागात आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी या पुनर्मिलनासाठी खास बेळगावात एकत्र आले. बालमैत्रीचा हसरा जल्लोष, जुन्या शरारतींच्या आठवणी, आणि एकमेकांना पुन्हा भेटण्याचा उर्मीदार आनंद—यामुळे हा क्षण खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला.

 belgaum

या सोहळ्याचे समन्वयक म्हणून शशीकुमार पिल्लई, रतन जांग्रा, रणजीत नाईक, मिलिंद कुलकर्णी, अनिल वांडकर, अजय भाटिया आणि लक्ष्मण बन्ने यांनी विशेष परिश्रम घेतले.

ही भेट फक्त पुनर्मिलन नव्हे—तर पन्नास वर्षांच्या प्रेमाची, नात्यांची आणि आठवणींची पुन्हा उजळलेली शाळा होती!

st merry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.