बेळगाव लाईव्ह : कॅपिटल वन तर्फे शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत सलग 17 व्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या एस.एस.एल.सी. व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचा सोहळा रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी ज्योती महाविद्यालय, कॅम्प, बेळगाव येथे संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव विक्रम पाटील यांनी दहावीतील विद्यार्थ्यांना भविष्यातील योग्य मार्गदर्शन व समुपदेशन (counseling) नितांत गरजेचे असल्याचे प्रतिपादन करत कॅपिटल वनच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी मंचावर संचालक शरद पाटील, व्याख्याते सी. वाय. पाटील व बी. एम. पाटील, मागील वर्षातील यशस्वी विद्यार्थी कु. आशुतोष देसुरकर तसेच संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे उपस्थित होते.
संस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांपर्यंत…
स्वागतप्रास्ताविक करताना चेअरमन शिवाजीराव हंडे म्हणाले :
“विद्यार्थ्यांनी निर्भीडपणे परीक्षेला सामोरे जावे. ही परीक्षा जीवनाला कलाटणी देणारी आहे. आपले संपूर्ण एकाग्र योगदान देऊन यशस्वी भवितव्याची सुरुवात करावी.”
यासोबतच त्यांनी व्याख्यानमालेचे महत्त्व व विद्यार्थ्यांसाठी संस्थेचा उद्देश स्पष्ट केला.
उत्तम प्रतिसादात कार्यक्रमाची सुरुवात
उद्घाटन सोहळ्यास संस्थेचे संचालक, शिक्षकमंडळी, पालकवर्ग व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. वाय. पाटील यांनी केले, तर शरद पाटील यांच्या आभारप्रदर्शनाने उद्घाटन सत्राची सांगता झाली आणि व्याख्यानमालेस औपचारिक सुरुवात झाली.


