बेळगाव लाईव्ह :खानापूर हारूरी, मनतुर्गा आणि शेडेगाळी परिसरातील हालात्री नदी आणि नदीला जोडलेल्या विविध नाल्यांवर तसेच रामगुरवाडी नाल्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशामुळे नदी–नाल्यांचे पाणी गंभीर स्वरूपात दूषित झाले आहे. दूषित पाणी केवळ मानवच नव्हे तर जनावरांनीही पिण्यास नकार दिला आहे. या परिस्थितीचा शेतमालावर मोठा परिणाम होत असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी वाळू उपसा थांबविण्याची विनंती केल्यावर उलट त्यांनाच धमक्या देण्यात येत असून,
“कोणाकडेही तक्रार करा, आम्ही कोणालाही भीत नाही; आमच्या मागे पोलीस, जिऑलॉजिस्ट अधिकारी व लोकप्रतिनिधी आहेत,” अशी थेट उघड धमकी वाळूमाफियांनी दिल्यामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.
या निषेधार्थ मनतुर्गा, शेडेगाळी तसेच खानापूरमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन दूषित पाण्याने भरलेली बॉटल आणि निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.
दूषित पान्याचा परिणाम मलप्रभा नदीपर्यंत
हालात्री नदीतील दूषित पाणी पुढे मलप्रभा नदीत मिसळत असून याचा थेट परिणाम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलवर होत आहे. त्यामुळे खानापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट निर्माण झाले आहे.
रामगुरवाडी नाल्यातील परिस्थिती तर अतिशय भयावह असून,
“पावसात डबक्यात साचलेले चिखलयुक्त पाणी देखील यापेक्षा चांगले असते,”
असे ग्रामस्थ सांगत आहेत. शनया गार्डन परिसरात कपडे धुण्यासाठी येणाऱ्या महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जबाबदार यंत्रणांचे दुर्लक्ष?
स्थानिकांच्या मते, संपूर्ण परिस्थितीची माहिती जिऑलॉजिस्ट खात्याला असूनही आर्थिक देवाण–घेवाणेच्या जोरावर वाळू माफियांना वरदहस्त मिळत आहे. लाइसन्स नसलेल्या आणि बिनपासिंग टिप्परद्वारे दिवसाढवळ्या वाळू वाहतूक होत असूनही पोलीस आणि जिऑलॉजिस्ट विभाग दोघेही डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नंदगड परिसरातही अवैध वाळू उपसा
नंदगड परिसरातही वाळूमाफियांची सक्रियता वाढली असून तेथील नालेही मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहेत. त्यामुळे त्वरित कारवाईची मागणी जोर धरत आहे.
ग्रामस्थांचा इशारा
परिस्थिती तातडीने सुधारली नाही तर पर्यावरण, आरोग्य आणि सार्वजनिक हितासाठी मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या निवेदनाद्वारे अवैध वाळू उपशावर तात्काळ बंदी, यात सामील अधिकारी व लोकप्रतिनिधींची चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.
हा गंभीर पर्यावरणीय प्रश्न दुर्लक्षित राहिल्यास पुढील काळात संपूर्ण खानापूर तालुक्यापुढे आरोग्याचे मोठे संकट उभे राहू शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. उपसा हलात्री नदी व रामगुरवाडी नाला पूर्णतः दूषित
मनतुर्गा–शेडेगाळी ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांना दूषित पाण्याच्या बॉटलसह निवेदन देणार
बेळगाव लाईव्ह :खानापूर हारूरी, मनतुर्गा आणि शेडेगाळी परिसरातील हालात्री नदी आणि नदीला जोडलेल्या विविध नाल्यांवर तसेच रामगुरवाडी नाल्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशामुळे नदी–नाल्यांचे पाणी गंभीर स्वरूपात दूषित झाले आहे. दूषित पाणी केवळ मानवच नव्हे तर जनावरांनीही पिण्यास नकार दिला आहे. या परिस्थितीचा शेतमालावर मोठा परिणाम होत असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी वाळू उपसा थांबविण्याची विनंती केल्यावर उलट त्यांनाच धमक्या देण्यात येत असून,
“कोणाकडेही तक्रार करा, आम्ही कोणालाही भीत नाही; आमच्या मागे पोलीस, जिऑलॉजिस्ट अधिकारी व लोकप्रतिनिधी आहेत,” अशी थेट उघड धमकी वाळूमाफियांनी दिल्यामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.
या निषेधार्थ मनतुर्गा, शेडेगाळी तसेच खानापूरमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन दूषित पाण्याने भरलेली बॉटल आणि निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.
दूषित पान्याचा परिणाम मलप्रभा नदीपर्यंत
हालात्री नदीतील दूषित पाणी पुढे मलप्रभा नदीत मिसळत असून याचा थेट परिणाम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलवर होत आहे. त्यामुळे खानापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट निर्माण झाले आहे.
रामगुरवाडी नाल्यातील परिस्थिती तर अतिशय भयावह असून,
“पावसात डबक्यात साचलेले चिखलयुक्त पाणी देखील यापेक्षा चांगले असते,”
असे ग्रामस्थ सांगत आहेत. शनया गार्डन परिसरात कपडे धुण्यासाठी येणाऱ्या महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जबाबदार यंत्रणांचे दुर्लक्ष?
स्थानिकांच्या मते, संपूर्ण परिस्थितीची माहिती जिऑलॉजिस्ट खात्याला असूनही आर्थिक देवाण–घेवाणेच्या जोरावर वाळू माफियांना वरदहस्त मिळत आहे. लाइसन्स नसलेल्या आणि बिनपासिंग टिप्परद्वारे दिवसाढवळ्या वाळू वाहतूक होत असूनही पोलीस आणि जिऑलॉजिस्ट विभाग दोघेही डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नंदगड परिसरातही अवैध वाळू उपसा
नंदगड परिसरातही वाळूमाफियांची सक्रियता वाढली असून तेथील नालेही मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहेत. त्यामुळे त्वरित कारवाईची मागणी जोर धरत आहे.
ग्रामस्थांचा इशारा
परिस्थिती तातडीने सुधारली नाही तर पर्यावरण, आरोग्य आणि सार्वजनिक हितासाठी मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या निवेदनाद्वारे अवैध वाळू उपशावर तात्काळ बंदी, यात सामील अधिकारी व लोकप्रतिनिधींची चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.
हा गंभीर पर्यावरणीय प्रश्न दुर्लक्षित राहिल्यास पुढील काळात संपूर्ण खानापूर तालुक्यापुढे आरोग्याचे मोठे संकट उभे राहू शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.