बेळगाव लाईव्ह :न्यू गांधीनगर मुख्य रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी प्राणघातक शस्त्र घेऊन वावरणाऱ्या एका इसमास माळमारुती पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडील शस्त्र जप्त केले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नांव मुस्ताक दस्तगीरसाब दावणगेरे (वय 33, चौथा क्रॉस न्यू गांधीनगर केजीएन गल्ली बेळगाव) असे असून सदर इसम हा रावडी शिटर आहे.
माळमारुती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील न्यू गांधीनगर मुख्य रस्त्यावर मुस्ताक हा हातात कोयता घेऊन वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची तातडीने दखल घेत माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक होनप्पा तळवार यांनी संबंधित रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणी करून मुस्ताक दावणगेरे याला ताब्यात घेतले.
तसेच त्याच्याकडील प्राणघातक धारदार कोयता जप्त केला. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.


