बेळगाव लाईव्ह : जिल्हाधिकारी कार्यालयातील संरक्षक भिंत जुनाट झाली असून, या ठिकाणी लवकरच नवे कंपाउंड बांधण्यात येणार आहे.
कार्यालयाची सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी तसेच आंदोलनादरम्यान आंदोलकांना कार्यालयात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी जुन्या कंपाउंडचे नूतनीकरण केले जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि आंदोलने थोपवण्यासाठी भिंत उंच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याचबरोरबर जिल्हाधिकारी कार्याकायाचे नूतनीकरण देखील करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर संरक्षक भिंतीचे नूतनीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वेक्षण करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कंपाउंड भिंतीची उंची वाढवण्यात येणार असून, यासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. रस्त्यासमोर ६५ मीटर लांब आणि ३० मीटर रुंद जागेवर हे बांधकाम केले जाईल. नव्या संरक्षक भिंतीसोबतच या ठिकाणी इतर सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


