बेळगाव लाईव्ह :आगामी शनिवार, २२ नोव्हेंबर २०२५ रोजी श्रीनगर 33 केव्ही GSS सबस्टेशनमध्ये तातडीच्या देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असून, सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत (एकूण ८ तास) वीज पुरवठा पूर्णपणे खंडित राहणार आहे.
ज्या भागात वीज खंडित राहणार
श्रीनगर GSS मधून पुरवठा होणारे खालील फीडर्स व परिसर प्रभावित होतील:
- F-1 विश्वेश्वरय्या नगर
- F-2 श्रीनगर
- F-3 अंजनेय नगर
- F-6 अशोक नगर
- F-7 ICMR
- F-8 चन्नम्मा सर्कल परिसर
याशिवाय:
बँक ऑफ महाराष्ट्र, रेड्डी भवन, जैन मंदिर परिसर, पाणीपुरवठा विभाग, शंकरनंद हाऊस, डी.सी. हाऊस, आदर्श कॉलनी, पीडब्ल्यूडी क्वार्टर्स, नीरावरी विभागाचे क्वार्टर्स, के-२ व बी.ई.ओ. कार्यालय परिसर, एनसीसी कार्यालय, जाधव नगर, उमेश अपार्टमेंट, बुडा कॉम्प्लेक्स, हनुमान रस्ता, स्विमिंग पूल मैदान, कर विभाग, चन्नम्मा सोसायटी, असदखान सोसायटी, अहमद नगर, स्मार्ट सिटी क्षेत्र, बी रस्ता, C.P.Ed मैदान, सरदार स्कूल–सस्ते सरदार मैदान परिसर, काकतीवेस, डीएसपी–RSP कार्यालय परिसर, झेडपी कार्यालय, कॉलेज रोड, सी-पोलीस लाइन, आयुक्तांचे नवीन कार्यालय, RLS कॉलेज, पशुवैद्यकीय रुग्णालय, गांधीभवन, काळअंबराई परिसर आदी भागांमधील वीज पुरवठा बंद राहील.
नागरिकांना पूर्वसूचना
विजयपुरवठा कंपनीने नागरिक, व्यावसायिक, दुकानदार व उद्योगपतींना या खंडित कालावधीबद्दल आधीच तयारी ठेवण्याचे आवाहन केले आहे.
अत्यावश्यक सेवा — रुग्णालये, पाणीपुरवठा यंत्रणा यांच्यासाठी पर्यायी बॅकअप सुविधा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वीजपुरवठा कामे निर्धारित वेळेत पूर्ण केल्यानंतर पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


