Saturday, December 6, 2025

/

मराठा हॉकी आणि बेळगाव हॉकी टीमचा एकत्र सराव

 belgaum

बेळगाव लाईव्ह :भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीला उच्च पातळीवर नेण्यासाठी बेळगाव हॉकीचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना वेगवेगळ्या सेवा सुविधा देण्याकडे भर देण्याबरोबरच त्यांचा सराव हा प्रमुख दृष्टिकोन ठेवून बेळगाव हॉकी असोसिएशन काम करते. याचाच भाग म्हणून मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या हॉकी टीमच्या खेळाडूंसोबत बेळगाव हॉकीच्या खेळाडूंचा एकत्रित सराव सामना शनिवारी घेण्यात आला.

टिळकवाडी येथील लेले मैदानावर हा एकत्रित सरावाचा सामना शनिवारी सकाळी झाला. मराठा चे हॉकी कोच श्रीकुमार आणि विजय पाटील तर बेळगाव हॉकीचे कोच सुधाकर चाळके आणि उत्तम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सराव सामना झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

मराठा लाईट इन्फंट्रीच्या हॉकी खेळाडूंचा अनुभव आणि त्यांना मिळणारे प्रशिक्षण आणि त्यातून हॉकी खेळातील बारकावे टिपण्याची संधी बेळगाव हॉकीच्या खेळाडूंना या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली.

 belgaum

बेळगाव हॉकीचे असंख्य खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकू लागले आहेत. त्या पातळीवर जाऊन आपला खेळ दाखवत असताना तो अधिक अचूक आणि प्रगत असला पाहिजे याची काळजी खेळाडूंना घ्यावी लागते. यासाठीचे शिक्षण देण्याची जबाबदारी ओळखून त्यांचे प्रशिक्षक काम करीत आहेत.


मराठाच्या खेळाडूंच्या पद्धती आणि इतर गोष्टी टिपणे महत्त्वाचे असते, एकत्रित सामना खेळताना एकमेकांकडून शिकण्याची प्रक्रियाही पार पाडण्यात आल्याची माहिती यावेळी राष्ट्रीय कोच आणि माजी लष्करी अधिकारी सुधाकर चाळके यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.