belgaum

हिंडलगा येथील काँग्रेस भवन : जमीन वाटपाला मंत्रिमंडळाची मान्यता

0
58
Hk patil
 belgaum

बेळगाव लाईव्ह: राज्य मंत्रिमंडळाने बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील हिंडलगा येथे नवीन काँग्रेस भवन बांधण्यासाठी 1 एकर जमीन देण्यास मान्यता दिली आहे. हिंडलगा गावातील आर.एस. क्र. 189/1 येथे असलेली ही जमीन सरकारी मार्गदर्शक मूल्याच्या फक्त 5 टक्के दराने दिली जाणार असल्यामुळे पक्षाच्या स्थानिक घटकाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सदर मालमत्ता काँग्रेस भवन ट्रस्ट (नोंदणीकृत), बेंगलोर येथे हस्तांतरित केली जाईल. मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना कायदा आणि पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी “हा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांची मागणी आणि बेळगाव ग्रामीणच्या संघटनात्मक गरजांमुळे हा निर्णय आवश्यक ठरला. नवीन भवन हिंडलगा येथील समुदाय आणि आमच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना सेवा देईल,” असे नमूद केले.

सध्या, काँग्रेस जिल्हा कार्यालय बेळगाव शहरातील आरटीओ सर्कल येथून कार्यरत असून ते पक्षाच्या बैठकांचे प्राथमिक ठिकाण आहे. तथापि ग्रामीण घटकांसाठी समर्पित सुविधेचा अभाव हे दीर्घकाळापासूनचे एक आव्हान होते. हिंडलगा येथील प्रस्तावित काँग्रेस भवन ग्रामीण बैठका, संघटनात्मक उपक्रम, प्रशिक्षण शिबिरे, जनसंपर्क आणि सामाजिक समस्यांवरील चर्चा यांचे केंद्र म्हणून काम करून ही उणीव भरून काढेल अशी आशा आहे.

 belgaum

काँग्रेस भवनांच्या नियोजित इमारतीत एक प्रेक्षागृह, बैठकीचे सभागृह, पक्ष कार्यकर्त्यांसाठी नियुक्त कार्यालयीन जागा आणि कागदपत्रे साठवणूकीचा सुरक्षित कक्ष असेल अशी अपेक्षा आहे. निवडणुकीच्या तयारीत आणि ग्रामीण नागरिकांशी संवाद सुलभ करण्यात ही सुविधा महत्त्वाची भूमिका बजावेल, असा पक्ष नेत्यांचा असा विश्वास आहे. सरकार जमीन हस्तांतरण प्रक्रिया जलद करेल अशी अपेक्षा असून त्यानंतर काँग्रेस भवनाचे बांधकाम सुरू होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.