बेळगाव लाईव्ह :शिवबसवनगर, बेळगाव येथे सार्वजनिक ठिकाणी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करून वावरणाऱ्या एका युवकाला माळमारुती पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नांव मोहम्मदकैफ असिफ बागवान (वय 23, रा. दुसरा क्रॉस, उज्वलनगर, बेळगाव) असे आहे.
सदर युवक शिवबसवनगर येथील विभा हॉस्पिटल जवळ सार्वजनिक ठिकाणी अस्वाभाविक वर्तन करत असल्याचे आढळून येताच माळ मारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी. एम. मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.
चौकशी वेळी त्याने कोणत्यातरी अंमली पदार्थाचे सेवन केल्याचा संशय आल्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तेंव्हा मोहम्मदकैफ याने गांजाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.




