बेळगाव लाईव्ह : गोवा धर्मप्रांताच्या सेवेत असलेले आणि मूळ संगरगळी (ता. खानापूर) येथील वरिष्ठ जेज्वीट पाद्री फादर कुस्तास लिमा, एस.जे. यांचे शुक्रवारी दुपारी गडहिंग्लज येथे निधन झाले. निधनाच्या वेळी ते गडहिंग्लज येथील संत आंतोनी चर्चमध्ये पॅरिश प्रीस्ट म्हणून कार्यरत होते. अल्पशा आजारासाठी त्यांच्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
फादर लिमा हे हसतमुख, सौम्य स्वभावाचे आणि लोकाभिमुख धर्मगुरु म्हणून ओळखले जात. समुदायात श्रद्धा निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले होते.
त्यांनी डिसेंबर 2009 मध्ये पाद्री पदाची दिक्षा घेतली होती. त्यानंतर आजरा, खानापूर, गडहिंग्लज येथे पॅरिश प्रीस्ट म्हणून तसेच खानापूर येथील आयटीआयचे संचालक म्हणून त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली.

त्यांच्या निधनाने दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि गोवा या भागातील ख्रिस्ती समुदायात हळहळ व्यक्त होत आहे. बेळगाव डायोसीजचे बिशप डॉ. डेरीक फर्नांडीस, सेंट पॉल्सचे प्राचार्य फादर सायमन फर्नांडीस तसेच अन्य धर्मगुरूंनी एक समर्पित आणि सेवाभावी पाद्री गमावल्याचे दुःख व्यक्त केले आहे.
**अंत्यविधी :**
फादर लिमा यांचे पार्थिव **रविवार, दि. 9 रोजी** दुपारी **2 वाजता फातिमा कॅथेड्रल, बेळगाव** येथे ठेवण्यात येईल. **दुपारी 3 वाजता** अंत्यप्रार्थना होईल. त्यानंतर **गॉल्फ कोर्स शेजारील ख्रिस्ती दफनभूमीत** दफनविधी पार पडेल.



