बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील सुवर्ण सौर मध्ये आगामी 8 डिसेंबर पासून सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर उत्तर कर्नाटक वेगळे राज्य करावे अशा मागणीला जोर धरू लागला आहे.
कर्नाटक राज्याचे विभाजन करून उत्तर कर्नाटक या नावाने स्वतंत्र राज्याची घोषणा करावी, या मागणीसाठी उत्तर कर्नाटक विकास वेदिकेतर्फे बेळगाव सुवर्ण विधानसौध समोर आज सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे.
उत्तर कर्नाटक विकास वेदिकेचे अध्यक्ष अशोक निंगय्यास्वामी पुजारी यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या या आंदोलनात वेदिकेचे अन्य पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा दिल्याची घोषणा करावी. सुवर्ण विधानसौध येथे राज्यस्तरीय सचिव दर्जाचे कार्यालय स्थलांतरित करण्यात यावे. अन्यथा स्वतंत्र अशा कित्तूर कर्नाटक राज्याची निर्मिती केली जावी, या मागणीसाठी सदर आंदोलन करण्यात येत आहे.
या सुमारे 35 जण सहभागी होऊन निदर्शने करत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्तर कर्नाटक विकास वेदिकेचे प्रमुख बी. डी. हिरेमठ, सामाजिक कार्यकर्ते भीमप्पा गडाद, बी. जे. निरलगीमठ, प्रवीण पाटील, उत्तर कर्नाटक होराट समितीचे राज्याध्यक्ष नागेश गोळशेट्टी, बेळगाव जिल्हाध्यक्ष अडवेश इटगी आदींचा समावेश आहे.


