बेळगाव लाईव्ह : कार्यकर्ते नेत्यांकडे आपल्या भागातील समस्या सोडविण्याची मागणी करत असतात. अनेकदा ही मागणी पूर्णही होते, पण काहीवेळा त्या मागणीच्या पूर्ततेच्या वेळी तो कार्यकर्ता हयात नसतो. अशाच एका कार्यकर्त्याच्या स्मरणार्थ चक्क नवे बसस्थानक उभारण्यात आले आहे — असा हृदयस्पर्शी प्रसंग घडला आहे. बेळगाव शहरातील विजय नगर परिसरात.
विजय नगर भागात बस स्थानक व्हावे अशी त्या भागातील दिवंगत अजित हलकर्णी यांची मागणी होती त्या ठिकाणी माजी खासदार मंगला अंगडी यांच्या माध्यमातून बस स्थानक उभे करण्यात आले त्याचे उदघाटन झाले त्यावेळी मागणी केलेले विजय हलकर्णी हयात नव्हते यासाठी बस स्थानकास त्या दिवंगत कार्यकर्त्याला समर्पित करण्यात आले त्याच्या स्मरणार्थ बांधण्यात आले आहे.
विजयनगर (हिंडलगा, बेळगाव) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकाचे उद्घाटन श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांच्या हस्ते पार पडले. हे बसस्थानक त्यांच्या अनुदानातून उभारण्यात आले असून, दिवंगत अजित हलकर्णी यांच्या स्मरणार्थ हे स्थानक समर्पित करण्यात आले आहे.
या प्रसंगी बोलताना श्रीमती मंगला सुरेश अंगडी म्हणाल्या की, “या बसस्थानकाचा उपयोग विजयनगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात करून घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात भाजप ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, “हे बसस्थानक हे विजयनगरवासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न होते. दिवंगत अजित हलकर्णी आणि मिथुन उसळकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे स्वप्न साकार झाले आहे. या स्थानकाचे उद्घाटन हे दिवंगत हलकर्णी यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे. एका सामान्य भाजपा कार्यकर्त्याला असे स्थानक समर्पित होणे, हा पक्षासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
या कार्यक्रमाला हिंडलगा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर, नागेश मन्नोळकर, लक्ष्मी परमेकर , मिथुन उसळकर, लता उसळकर, भाग्यश्री कोकितकर, हलकर्णी परिवार, विलास तहसीलदार तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हॅशटॅग्स:


